Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

श्री गुरु हावगीस्वामी मठात प्रसाद निटुरे यांना श्रध्दांजली

श्री गुरु हावगीस्वामी मठात प्रसाद निटुरे यांना श्रध्दांजली

उदगीर (प्रतिनिधी)  माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचे सुपुत्र प्रसाद निटुरे यांचे अपघाती निधन झाले  . उच्च विद्याविभूषित एक मितभासी व्यक्तीमत्व असलेले तरुण व्यक्तीमत्वचे अपघाती निधन झाले.त्याच्या निधनाने उदगीर शहर व परिसरात हळव्यक्त होत आहे.निटुरे परिवारावर कोसळलेल्या दु:खात सर्व क्षैत्रातील मान्यवर, जातीधर्माचे महिला पुरुष ,युवक अबाल वृध्द भेटून परिवाराचे सांत्वन करण्यात येत आहे.
सध्या श्रीगुरु हावगी स्वामी मठ  येथे श्री गुरु हावगी स्वामी यात्रा महोत्सवानिमित्य परमरहस्य ग्रंथाचे पारायण व सप्तकोटी शिव महामंत्र जपयज्ञ सुरु आहे या धार्मिक कार्यक्रमात प्रसाद निटुरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.यावेळी मठाचे मठाधिश डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी प्रसाद यांचा गौरव करुन कमी वयात उच्चविद्या संपादन करुन  उद्योग व्यवसायात पदार्पण करुन कमी कालावधीत व्यवसायात वूगळा ठसाउमठवला होता परंतू जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला या प्रमाणे तू आपल्यातून गेले असले तरी कमी काळात केलेले कार्य चिरकाल स्मरणात राहणार आहे .धार्मिक वृत्तीचे असलेले निटुरे परिवारावर कोसळलेल्या दु:खात  संपुर्ण भक्तगण सहभागी आहे.ईश्वर निटुरे परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना केली.यावेळी शिव किर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शि.भ.प.शिवराज नावंदे गुरुजी ,मंदिर कमिटेची सुभाष धनूरे, रेखातीई कानंमदे यांच्यासह पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात