नागलगाव येथे विविध विकास कामाचा शुभारंभ
उदगीर:तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकिला एक वर्ष पूर्ण झाले असून एक वर्षाच्या आत गावाच्या विकासासाठी जवळपास ९३ लक्ष रुपयांची कामे मंजूर करून घेतली या कामासाठी सरपंच व उपसरपंच यांनी सतत पाठपुरावा केल्याने एक वर्षात ९३ लक्ष रुपयांच्या कामाला मंजुरी मिळाली या ९३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ ७ जानेवारी रोजी नागलगाव येथे करण्यात आला.फेव्हर ब्लॉक रस्ता,सी.सी.रोड रस्ता,विठ्ठल मंदिर येथील पूल बांधकाम,नाली व रोड,व सभागृह अशा विविध विकास कामाचे शुभारंभ श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी सरपंच सुभाष मुन्ना राठोड, उपसरपंच नेताजी कांबळे,माजी सरपंच राजीव वाघे,माजी चेअरमन गोविंद पाटील,बस्वराज बाळे,माजी उपसरपंच कृष्णाजी गायकवाड, ग्रामविकास अधिकारी रोडेवाड, ग्रामपंचायत सदस्य माधव गुंडरे,बस्वराज गुडसुरे,चंद्रपाल कारंजे,अनिल गुरमे,गोरख चव्हाण, गणपत पाटील,बाबुराव बिरादार, बालाजी पाटील,अनिल कांबळे,शिवाजी जाधव,किशन राठोड,नामदेव राठोड,भीमराव पवार,लक्ष्मण चव्हाण,भागवत शेरे,ग्रामपंचायतचे लिपिक रमेश बिरादार,आदी गावातील नागरिक उपस्थित होते.९३ लक्ष रुपयांचे कामे मंजूर करून आणल्याबद्दल गावकऱ्यांनी सरपंच व उपसरपंचाचे अभिनंदन केले.


0 Comments