उदगीर अहमदपूर रोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वार ठार
उदगीर:अहमदपूर रोडवर टेम्पोच्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना २९ जानेवारी रोज सोमवारी सांयकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,उदगीर अहमदपूर रोडवर बालाजी फड यांच्या शेताजवळ आयशर टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील एम.एच.२४ एबी ८५४१ क्रमांकाचा टेम्पो निष्काळजीपणाने व हायगाईने भरधाव वेगाने चालवून मोटारसायकल क्रमांक एम.एच.१४ डीयु १५३१ पाठीमागून जोराची धडक दिली यात सतिष त्र्यंबक सुरनर वय ३२ राहणार वंजारवाडी ता. उदगीर हे जागीच ठार झाले.धोंडीराम माधव करले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात टेम्पो चालकविरुद्ध गुरंन ६९/२३ कलम २७९,३०४(अ) भादवी प्रमाणे ३० जानेवारी रोज मंगळवारी बारा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे हे करीत आहेत.
0 Comments