शेतीच्या वादातून मारहाण, उदगीर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी ठोठावली चार आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा
फिर्यादीस दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे दिले आदेश
उदगीर: जळकोट तालुक्यात शेतीच्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी उदगीर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी चार आरोपींना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.थोडक्यात माहिती अशी की जळकोट तालुक्यातील येवरी येथील मदन विठ्ठल वायगावे व त्यांचा लहान भाऊ व्यंकट विठ्ठल वायगावे यांच्यात बरेच दिवसापासून शेतीचा वाद होता.दोन जून २०१९ रोजी व्यंकट विठ्ठल वायगावे व त्याची पत्नी मुक्ताबाई व्यंकट वायगावे यांनी शेतात तुराट्या वेचत असताना मदन विठ्ठल वायगावे त्याची पत्नी व दोन मुले विठ्ठल वायगावे, चंद्रकांत वायगावे यांनी आपसात संगनमत करून तू आमच्या रानात का आलास तुझे रान इथे नाही म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन चौघांनी त्यांना मारहाण केली, विठ्ठल वायगावे यांने दगडाने मारून व्यंकट विठ्ठल वायगावे यांचे डोके फोडले याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.जळकोट पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र उदगीर सत्र न्यायालयात सादर केले होते, त्यावर दिनांक ३० जानेवारी रोज मंगळवारी उदगीर येथिल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र २ श्री के ए पोवार यांच्यासमोर सुनावणी झाली असता सबळ पुराव्याच्या आधारे फौजदारी प्रकरण क्रमांक ३२८/२०१९ मध्ये चार आरोपिंना कलम ३२३ मध्ये ६ महिणे शिक्षा व प्रत्येकी १०००रुपये दंड तसेच कलम ३२४ मध्ये १ वर्ष शिक्षा व प्रत्येकी ३००० रुपये दंड व फिर्यादिस १०.००० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला.
0 Comments