वृक्षारोपण ही काळाची गरज - न्यायाधीश सुभेदार
उदगीर:वातावरणात सातत्याने बदलत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.असे प्रतिपादन तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश परमेश्वर सुभेदार यांनी केले. ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत परसबाग व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर येथील
शालेय परिसर व मोकळ्या जागी परसबाग व वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. व्यासपीठावर संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे प्राचार्य राजकुमार नावंदर, विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एम बांगे, उप मुख्याध्यापक बी.बी नागरवाड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हनमंते, यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपाप्रसंगी व्ही.एम बांगे म्हणाले की, दिवसेंदिवस वाढते शहरीकरण आणि त्यातून उद्भवणाऱ्या प्रदूषणासारख्या अनेक समस्या या सजीव सृष्टीला कायम भेडसावत असतात. यावर एक उपाय म्हणून वृक्ष लागवडीसह त्या वृक्षाच्या वाढीसाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घेऊन वृक्षारोपणाचे संगोपन आणि जतन व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वृक्षारोपण व परसबाग कार्यक्रमाचे प्रमुख भाऊसाहेब कल्लूरकर, एन.सी वट्टमवार, एस.एम बिरादार,वनमाला उखळकर,रूपाली बालूरे,एन. आर जवळे,परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान बिरादार यांनी केले तर बी.बी नागरवाड यांनी मानले.
0 Comments