महाकाल रेडिमिक्स काँक्रेट प्लांटचा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
उदगीर:तालुक्यातील शेल्हाळ पाटी बिदर रोड नारायण ऑग्रो ऑईल मिलच्या समोर नव्याने उभारण्यात आलेल्या महाकाल रेडिमिक्स काँक्रेट प्लांटचा शुभारंभ राज्याचे क्रीडा युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती मुन्ना पाटील,खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष समीर शेख,उदयसिंह ठाकूर,नागलगावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड, प्राचार्य सूर्यकांत चवळे,अनिल गुरमे,राजू गुंडरे,दिगंबर राठोड,गणपत पाटील,बाळू राठोड, विजय राठोड,लक्ष्मण चव्हाण, विकास जाधव,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाकाल रेडिमिक्स काँक्रेट प्लांटचा शुभारंभ पार पडला.
0 Comments