*केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचा उदगीर दौरा*
लातूर, दि. 28 केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे सोमवार, 29 जानेवारी 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
केंद्रीय मंत्री ना. रुपाला यांचे हैदराबाद येथून मोटारीने 29 जानेवारी रोजी दुपारी 1.45 वाजता उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प येथे आगमन होईल. दुपारी 2 वाजता ते उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाला भेट देतील, तसेच याठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करतील. दुपारी 3.15 वाजता उदगीर येथून मोटारीने हैदराबादकडे प्रयाण करतील.
*****
0 Comments