परतपूर पेट्रोल पंप येथे सर्व एसटी बसेसला थांबा देण्याची उदगीर आगार प्रमुखाकडे प्रहारची मागणी
उदगीर:आगारातून देगलुर कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेसला परतपुर पेट्रोल पंप हनुमान नगर येथे थांबा देण्याची उदगीर आगार प्रमुखाकडे प्रहारच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली. परतपुर तालुका मुखेड जिल्हा नांदेड ग्रामपंचायत अंतर्गत पेट्रोल पंप हनुमान नगर वस्तीतील लोकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपप्रमुख संदीप पवार यांच्याकडे तक्रार केली होती.तक्रारीची दखल घेत संदीप पवार यांनी उदगीरच्या आगार प्रमुखाकडे मागणी केली आहे. शालेय मुलाना मुक्रामाबाद येथे शिक्षण घेण्यासाठी जाण्यास बस थांबा नसल्याने शालेय विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.व शेतमजूर कामगारांना दैनंदिन उपजीविकेसाठी बाजारपेठ येथे जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत, याची माहिती मिळताच जिल्हा उपप्रमुख विनोद तेलंगे यांच्या मार्गदर्शनात उदगीर तालुका उपप्रमुख संदीप पवार,शहर उपाध्यक्ष मोहम्मद चौधरी,तालुका सरचिटणीस सुदर्शन सुर्यवंशी,परतपुर येथील प्रहार सेवक संदीप अनिल,पांडुरंग ज्ञानेश्वर,यांनी उदगीरचे आगार प्रमुख सतीश तिडके यांना निवेदन बस थांबा करण्याची मागणी केली आहे.
0 Comments