उदगीरातून मुलीला फूस लावून पळविले,शहर पोलिसांत गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील एका साडे सोळा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी सोमनाथपुर रोड येथून २७ जानेवारी रोजी साडे सोळा वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे अशी फिर्याद मुलींच्या आईने उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात आरोपीवर गुरंन २८/२४ कलम ३६३ भादवी प्रमाणे २८ जानेवारी रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.
0 Comments