जाणापूर परिसरात मुलींसोबत शारीरिक संबंध,ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
उदगीर: तालुक्यातील जाणापूर परिसरातील एका तांड्यावर एका १९ वर्षीय मुलींवर लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून धमकी दिल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जाणापूर शिवारात एका तांड्यावर एका १९ वर्षीय मुलीला आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्या सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध केला.व संबंध ठेवू दिले नाही तर तुझे लग्न होऊ देणार नाही तसेच फेसबुकवर व व्हाट्सपवर बदनामी करतो.तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गजानन सुभाष पवार यांच्यावर गुरंन ६६/२४ कलम ३७६,३७६ (२)(N) ५०६ भादवी प्रमाणे २८ जानेवारी रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत.
0 Comments