लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार,आरोपीवर गुन्हा दाखल
उदगीर: शहरातील बिदर रोड येथे एका २६ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की एका २६ वर्षीय फिर्यादी महिलेला आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्या सोबत जबरदस्तीने संभोग केला.व सदर बाब कोणाला सांगितलीस तर जीवे मारू अशी धमकी दिली.पीडित महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सलीम महेबूब शेख यांच्यावर गुरंन ६५/२४ कलम ३७६,३७६ (२)(N) ५०६ भादवी प्रमाणे २७ जानेवारी रोजी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत.
0 Comments