उदगीर ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
उदगीर:हिंगोली जिल्ह्यातील विवीध पोलीस स्टेशन मध्ये दरोडा जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असलेले आरोपी उदगीर जवळ येत असल्याची माहिती हिंगोली गुन्हे शाखा कडून मिळाल्याने उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकते यांनी 4 आरोपी असलेल्या अल्टो कार क्रमांक MH 28 AN 2695 चा पाठलाग केला असता आरोपी हे सुसाट वेगाने गाडी पळवत होते. त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग चालूच होता. तेंव्हा देवकते यांनी चाकुर पोलीसाना माहिती कळविली. त्यानंतर मोहदळ पाटी येथे 14 फेब्रुवारी रोज बुधवारी दुपारी 3:30 वाजता सदर आरोपींना गाडी आडवी लावून सदर आरोपींना ताब्यात घेवून हिंगोली एलसीबीचे PSI श्री. इटूबोने व त्यांचे पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरच्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तारू, पोलीस हेडकॉन्स्टेबल भिसे,शरद मुंढे,नाना शिंदे,देवडे यांनी सहभाग नोंदवला जवळपास 70 किलोमीटर पाठलाग करून दरोडेखोरांना पकडण्यात आले,
0 Comments