Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

भाजपच्या घर घर चलो अभियानास नागरिकांचा प्रतिसाद : शहराध्यक्ष मनोज पुदाले

भाजपच्या घर घर चलो अभियानास नागरिकांचा प्रतिसाद : शहराध्यक्ष मनोज पुदाले

उदगीर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पुदाले व अभियान संयोजक सुधीर भोसले यांच्या नेतृत्वाखाली शहरात घर घर चलो अभियान राबविण्यात आले असून या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिली.
    घर घर चलो अभियानासाठी उदगीर शहरातील ७५  बुथवर ७५ पदाधिकारी कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात आली होती. नेमणूक केलेल्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी बुथवर जावून २०१४ ते २०२४ या दहा वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केला आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोदी सरकारने मोठी कामगिरी करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. मोदी सरकारला भाजपाशासित अनेक राज्य सरकारांनीही उत्तम साथ देत आपापल्या राज्यात मोठा विकास केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी भाजपच्या वतीने हे अभियान राबविण्यात आले असल्याची माहिती शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिली.
 भाजपाच्या वतीने या राबविण्यात आलेल्या या घर घर चलो अभियानातून केंद्र शासनाच्या वतीने सामान्य जनतेसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती यावेळी शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिली. दरम्यान हे अभियान मतदारपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाचे संयोजक सुधीर भोसले, माजी नगरसेवक ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, आनंद बुंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रभावीपणे भूमिका मांडण्याचे काम केले असल्याचेही शहराध्यक्ष पुदाले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात