Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्राहलय,अभ्यासिका बांधकामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर*

*उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्राहलय,अभ्यासिका बांधकामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर* 

*क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*

*साहित्यारत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा ठेवा जपणार* 

उदगीर : महापुरुषांच्या विचारानेच आपण सर्वजण घडलो असुन उदगीर शहरात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करुन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी निधी मंजूर केला आहे. या पुतळ्याच्या बाजूलाच साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्राहलय व अभ्यासिका  बांधकामासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातुन १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
गत वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांनी मागणी केली होती त्यांच्या मागणीचा विचार करुन त्यावेळी बोलताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आपण भव्य सांस्कृतिक सभागृह व  संग्राहलय, अभ्यासिका उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी उपस्थित समाजबांधवांना दिलेला शब्द ना.संजय बनसोडे यांनी पुर्ण केला असुन शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याशेजारीच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह, संग्राहलय, अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याने सर्व समाजबांधव व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रेमी नागरिकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
या सभागृहामुळे या भागातील समाजबांधवांना याचा फायदा होणार आहे तर अण्णाभाऊ साठे यांचे संग्राहलय उभारल्याने पुढच्या पिढीला प्रेरणा मिळाणार असुन या परिसरात अत्याधुनिक अभ्यासिका उभारून तालुक्यासह परिसरातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा उपयोग होणार आहे. यामुळे भविष्यात आपल्या भागातुन उच्च पदाचे अधिकारी तयार होणार असल्याची भावना क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
उदगीर मतदार संघ हा राखीव मतदार संघ असुन या भागातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहून या भागातील शेवटच्या घडकापर्यंत शासनाच्या योजना पोहचविण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचे ना.संजय बनसोडे हे नेहमीच सांगत असतात. मागील ४ वर्षाच्या काळात मतदार संघात रस्ते, विज, पाणी, आरोग्य, सिंचन, कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव, किल्ला दुरुस्तीसाठी निधी, बौध्द विहार, शादीखाना, मठासाठी व मंदिरासाठी निधी, पाणंद रस्ते, सभागृहे, इमारती, तलाठी भवन, शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, नाट्यगृह, पोलीस कर्मचारी वसाहत, पोलीस ठाण्याची इमारत, उड्डानपुल, चार पदरी रस्ता, पाणीपुरवठ्याची योजना, तिरु नदीवर बॅरेजेस, जसंधारणाची कामे, जलसिंचनाची कामे आदी कामे करुन मतदार संघाचा कायापालट करण्याचे काम ना.संजय बनसोडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात