अज्ञाताने शेकापूर येथे ऑटो पेटवून दिला,२५ हजारांचे नुकसान
उदगीर:तालुक्यातील शेकापूर येथे अज्ञाताने ऑटो पेटवून दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शेकापूर येथे घरासमोर लावलेला एम.एच.२४ एटी ३६३४ क्रमांकाचा ऑटो कोणीतरी अज्ञात इसमाने आग लावून पेटवून दिला यात २५ हजारांचे नुकसान झाले अशी तक्रार सुनील अंकुश शेल्हाळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञातावर गुरंन १०७/२४ कलम ४३५ भादवी प्रमाणे २१ फेब्रुवारी रोज बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पडिले हे करीत आहेत.
0 Comments