रेल्वेत चढताना प्रवाशी पाय घसरून अडकला गुडघ्यापासून पाय बाजूला
उदगीर:रेल्वे स्टेशन येथून धनाजी गुंडाजी माने राहणार कोणाळी ता.देवणी ह.मु.रेल्वे स्टेशन समोर उदगीर हे २१ फेब्रुवारी रोज बुधवारी रात्री १० वाजता रेल्वे स्टेशन लातूर रोड येथे जाण्यासाठी ट्रेन नंबर १७२०६ काकीनाडा साईनगर एक्सप्रेस गाडीत जनरल कोच मध्ये चढत असताना रेल्वे गाडी चालू झाली यात त्याचे पाय घसरले त्यात ते रेल्वे गाडी व प्लॉट फार्म मध्ये अडकले,त्या ठिकाणी सेवा बजावणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय राऊत व पोलीस हवालदार डफडे,पोलीस अंमलदार नागेश घोडके,यांनी तात्काळ रेल्वे गाडीतील प्रवाशांना सांगून चैन ओढण्यास सांगितले व रेल्वे गाडी थांबवून धनाजी गुंडाजी माने यास १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले,या अपघातात प्रवाशांचा एक पाय गुडघ्यापासून बाजूला निघाला तर दुसरा पायाचा पंजा बाजूला निघाला आहे,जखमी प्रवाशांला लातूरला हलविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
0 Comments