नागलगाव केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांच्या हस्ते प्रोजेक्टर भेट
उदगीर:तालुक्यातील नागलगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नागलगावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांच्या हस्ते प्रोजेक्ट देण्यात आले,शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण देता यावे यासाठी नागलगावचे सुपुत्र औरंगाबाद येथे पोलीस निरीक्षक पदावर असलेले संदीप गुरमे यांनी केंद्रीय शाळेला भेट दिली असता शाळेतील शिक्षकांनी प्रोजेक्टरची मागणी केली होती,शिक्षकांची मागणी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी नागलगावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांची भेट घेवून ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रोजेक्टर देण्याची विनंती केली,पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी केलेली विनंती मान्य करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नागलगाव केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला प्रोजेक्टर सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले,यावेळी ग्रामविकास अधिकारी रोडेवाड,ग्रामपंचायत सदस्य बस्वराज गुडसुरे,गणपत पाटील,ग्रामपंचायतीचे लिपिक रमेश बिरादार,विजय बंडे,चंदू चवळे,ग्रामपंचायतीचे सेवक केवडे, आदी उपस्थित होते,यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments