Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतदार संघातील तोंडचिर व घोणसी साठवण तलावासाठी ३४ कोटी ६७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर*

मतदार संघातील तोंडचिर व घोणसी साठवण तलावासाठी ३४ कोटी ६७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

*लवकरच निविदा प्रक्रिया होणार ; क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*

*उदगीर / जळकोट* : उदगीर तालुक्यातील तोंडचिर येथील १०१ ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन या साठवण तलावासाठी १९ कोटी ३१ लक्ष  ८५ हजार ८१० रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा खंबाळवाडी येथे २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन या साठवण तलावासाठी १५ कोटी ३६ लक्ष ३ हजार ८४४ रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असुन लवकरच याची निविदा प्रक्रिया होणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर तालुक्याती तोंडचिर व जळकोट तालुक्यातील घोणसी तांडा खंबाळवाडी येथे साठवण तलावाची निर्मिती झाल्यास या भागातील शेतकऱ्याचा शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होवून त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होईल.  त्याच बरोबर या भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल व जनावरांसाठी पाणी असल्यामुळे मुबलक चारा व पाणी मिळणार असल्याने दुधाचे उत्पन्न वाढेल शेती सोबतच दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा करुन या भागातील शेतकरी सुखी, समृध्द होईल अशी अपेक्षा ना.संजय बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
मतदार संघात दोन साठवण तलाव मंजूर केल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
तोंडचिर व घोणसी येथे साठवण तलाव मंजूर केल्याने या भागातील शेतकरी, शेतमजूर गावातील प्रतिष्ठित नागरीकांनी या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात