संत गाडगे महाराज थोर समाजसुधारक, अभियान प्रमुख संजय कांबळे
उदगीर:बहुजन विकास अभियान व विविध जाती-धर्माच्या वतीने थोर संत समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली,ज्या वेळेला लोकांना विज्ञानाचा गंधही माहीत नव्हता त्यावेळेला आपल्या वाणीतून विज्ञान समजून सांगण्याचा प्रयत्न संत गाडगे महाराजांनी केला, बुरसटलेल्या समाज व्यवस्थेला जागे करण्याचे काम आपल्या वाणीतून गाडगेबाबांनी केले,देशाला स्वछतेचा संदेश देणारे संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले,गाडगेबाबा आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते,असे प्रतिपादन अभियान प्रमुख संजय कांबळे यांनी बोलताना केले,ते शेतकी निवास येथील संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्कळ अर्पण करताना बोलत होते, यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रसिद्धीप्रमुख संजय राठोड,सय्यद चांद,लक्ष्मण आडे,रवी डोंगरे,अनिल भोसले,पांडुरंग मटके, सय्यद सरोवर,सतीश शिंदे,सुधाकर बिरादार,शेषराव हरणे,रत्नदीप गटकार,शिवाजी मुंजेवार,लखन पल्ले,आर्मी कमांडो,नितीन सूर्यवंशी,आदी उपस्थित होते.
0 Comments