बोरगाव येथे विद्युत शॉक लागून ७० वर्षीय शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
उदगीर:तालुक्यातील बोरगाव येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय शेतकऱ्यांचा विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बोरगाव येथे सोपान रानबा कुंभार (बोरगावकर) हे त्यांच्या शेतातील गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता ११ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास विद्युत शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला,मारोती समर्थ बोरगावकर यांनी दिलेल्या माहितीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू १२/२४ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे १२ फेब्रुवारी रोज सोमवारी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत. मयत शेतकऱ्यांचे मुले कामानिमित्त बाहेरगावी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0 Comments