शेेळ्याधील कृत्रिमरेतन तंत्रज्ञानामुुळे शेळीपालन व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल-डाॅ. एन. झेड. गायकवाड
उदगीर:पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, दिलासा जनविकास प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर आणि संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने "शेळ्यामधील कृत्रिम रेतन" या विषयावर पशुुसखींंसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेळ्यामधील कृत्रिम रेतन हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान सद्या विकसीत होत आहे. या प्रशिक्षणातून हे तंत्रज्ञान उत्तम प्रकारे अवगत करून पशुसखीनी याचा शेळ्यामध्ये वापर करावा यामुळे शेळ्यांच्या जातिवंत व उत्पादनक्षम पिल्लांंची पैदास होवून शेळीपालन व्यवसाय वृद्धिंगत होईल असे मत डाॅ. एन. झेड. गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांडले. या कार्यक्रमावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. राजकुमार पडिले जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, प्रशिक्षण समन्वयक डाॅ. अनिल पाटील हे उपस्थित होते. या प्रशिक्षणात 30 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. अनिल पाटील यांनी, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशिक्षण सहसमन्वयक डाॅ. प्रफुल्ल पाटील यांनी केले. यावेळी प्रशिक्षण संयोजन समितीचे सदस्य डाॅ. लक्ष्मीकांत कोकाटे व इतर प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती तसेच पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments