Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सुमठाणा येथे शेतीच्या वाटणीवरून नातवाने केला ९५ वर्षीय वयोवृद्ध आजोबाचा खून

सुमठाणा येथे शेतीच्या वाटणीवरून नातवाने केला ९५ वर्षीय वयोवृद्ध आजोबाचा खून

उदगीर:तालुक्यातील सुमठाणा येथे शेतीच्या व घराच्या वाटणीवरून नातवाने आजोबाचा खून केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी घडली आहे.खून करून आरोपी पळून जात असताना वाढवणा पोलिसांनी उदगीरच्या बस्थानकात आरोपींच्या मुसक्या आवळल्या,पोलिसांनी दिलेली माहिती असी की सुमठाणा येथील फिर्यादीच्या नावावर असलेल्या घराची व शेतीच्या वाटणीच्या कारणावरून फिर्यादीचा मुलगा बुद्धानंद राजेंद्र किवंडे याने फिर्यादीचे वडील दशरथ तुकाराम किवंडे वय ९५ वर्ष यांचा चोंडी,कोदळी जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या शेतातील घराच्या वरांड्यात लाकडाच्या जाड असलेल्या जळतानीने डोक्यात मारून डोके फोडून आणि विटाने छातीत मारून त्याचा खून केला,असी फिर्याद राजेंद्र दशरथ किवंडे यांनी वाढवणा पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी बुद्धानंद राजेंद्र किवंडे यांच्यावर गुरंन २५/२४ कलम ३०२ भादवी प्रमाणे ४ फेब्रुवारी रोज रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड हे करीत आहेत.घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. याची माहिती वाढवणा पोलिसांना मिळताच वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड,पोलीस हवालदार इकराम उजेडे, पोलीस नाईक मोहन केंद्रे,आरोपींच्या शोधात असताना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली की आरोपी उदगीर येथील बस्थानकात असून तो कर्नाटक राज्याच्या बसमध्ये बसून पळून जाण्याच्या तयारीत आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ उदगीर बस्थानक गाठून आरोपी बुद्धानंद किवंडे यांना ताब्यात घेतले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात