Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

पद रिक्त नसताना जाहिरात: मॅटची स्थगिती.

पद रिक्त नसताना जाहिरात: मॅटची स्थगिती.

छत्रपती संभाजीनगर:शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील सहायक प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र पदासाठी च्या भरती प्रक्रिया संदर्भात मा. प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर मा. न्या. पी. आर बोरा, मा. न्या. वि. आर. कारगावकर यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक  प्राध्यापक 
सूक्ष्मजीवशास्त्र करिता दोन पदे मंजूर असून सदर दोन्ही पदे विहित प्रक्रिये द्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिराती नंतर विहित प्रक्रिया पार पडून सदर पदे भरलेली आहेत. सदर पदे रिक्त नसताना एमपीएससी ने दिनांक 05.12.2023 रोजी सहायक प्राध्यापक  सूक्ष्मजीवशास्त्र शा. वै. म. धाराशिव करिता दोन पदांची जाहिरात प्रसिद्ध केली. जाहिरात प्रसिद्धी नंतर मा. अधिष्ठाता  शा. वै. म. धाराशिव यांनी आपल्या अहवालाद्वारे मा. सचिव, वैद्यकीय शिक्षण, मुंबई याना सदर पदे रिक्त नसल्याचे अवगत केले. सदर पद रिक्त नसताना देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येऊन दोन उमेदवाराची एमपीएस्सी मार्फत शिफारस करण्यात आली. सदर नाराजीने डॉ. तृप्ती मांडे यांनी ऍड. अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत मॅट छत्रपती संभाजीनगर येथे मूळ याचिका दाखल केली, सदर पदे मुळात रिक्तच नसताना एमपीएससी ने प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बेकायदेशीर असून याचिका कर्ता यांना किमान सहा वर्षे सेवा सातत्य देने आवश्यक आहे असा युक्तिवाद ऍड रेड्डी यांनी मांडला असता. सहायक प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र , शा. वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव या पदासाठी च्या भरती प्रक्रिया संदर्भात मा. प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर येथील मा. न्या. पी. आर बोरा, मा. न्या. वि. आर. कारगावकर यांच्या खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात