शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी कैलास सोमुसे-पाटील
जळकोट:तालुक्यातील अतनूर येथील शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कैलास गोविंदराव सोमुसे-पाटील यांची निवड करण्यात आली.
यासाठी मंगळवारी (दि.१३) झालेल्या बैठकीत समिती कार्यकारिणी निवडण्यात आली.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव २०२४
अध्यक्षपदी कैलास गोविंदराव सोमुसे-पाटील तर उपाध्यक्षपदी बालाजी येवरे-पाटील यांची कमिटी मार्फत सर्वानुमते बिनविरुद्ध निवड करण्यात आली. सचिव रवि पांचाळ, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे जळकोट तालुकाप्रमुख मुक्तेश्वर येवरे-पाटील, तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, सरपंच चंद्रशेखर पाटील, साहेबराव गव्हाणे-पाटील, विजयकुमार गव्हाणे-पाटील, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, रिपाईचे जळकोट तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, ग्रामसेवक एफ.एफ.शेख, तलाठी अतिक शेख, पोलीस पाटील प्रकाश पाटील, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोविंदराव येवरे-पाटील अतनूरकर, तंटामुक्ती अध्यक्ष मगदूम मुंजेवार, माजी सैनिक ईस्माईल मुंजेवार, माजी सैनिक आयुब मुंजेवार, ॲड.नवाज मुंजेवार, शफीयोददीन मुंजेवार, रफीयोददीन मुंजेवार, माधव बोंडगे, विनोद सोमुसे, नीलकंठ सोमुसे, बळवंत भांगे, संतोष जाधव, अमोल येवरे, सागर स्वामी, ओमराजे सोमुसे, मनोज बिचकुंदे, मारोती गुंडीले, गोविंद कोकणे, व्यंकटेश कोटगीरे, रवी पांचाळ, गोविंद बारसुळे, हणमंत कदम, माधव सोमुसे, खंडू गायकवाड, पांडू गायकवाड, किशन बारसुळे, प्रमोद संगेवार, शुभम येवरे, संजय स्वामी, विलास जाधव, श्रीकांत बोडेवार, सुधाम बाबर, आईनू महागामे, सैलानी महागमे, गुंडेराव सोमुसे, मयूर हिंगणे, चेतन कांबळे, सचिन बोडेवार, सिध्देश्वर बिचकुंदे, धनराज गव्हाणे, योगेश गव्हाणे, विष्णू सोमुसे, कमलाकर सोमुसे, मोनू मुंजेवार, प्रवीण कदम यांची निवड करण्यात आली. यंदा शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
0 Comments