Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगिरात स्कुटीस्वाराने दुचाकीस्वाराला मारहाण करुन केला खांदा फ्रक्चर; स्कुटीस्वारावर गुन्हा

उदगिरात स्कुटीस्वाराने दुचाकीस्वाराला मारहाण करुन केला खांदा फ्रक्चर; स्कुटीस्वारावर गुन्हा

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर:शहरातील बिदर गेट येथे माझ्या स्कुटीला कट का मारलास म्हणून खांद्यावर मारहाण करुन खांदा फ्रक्चर केला. याप्रकरणी शनिवारी (१७ फेब्रुवारी) रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्कुटीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१६ फेब्रुवारी रोजी रात्री सातच्या सुमारास फिर्यादी हा देवणी ते नागलगाव येथे मोटारसायकल क्र. एम.एच.२४ बी.टी.५७८२ या वरुन जात असताना उदगीर शहरातील बिदर गेट उड्डाणपूलाजवळ स्कुटीस्वार आला व मोटारसायकलस्वारास थांबविले तु माझे स्कुटीला कट का मारलास असे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्याने व बुटाने उजव्या हातावर व शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली तेव्हा झटापटीमध्ये ढकलुन देऊन खाली पडले व खांद्यावर जोर जोराने लाथा मारल्याने खांदा फॅक्चर झाला आहे.
याप्रकरणी दिपक नामदेव चव्हाण (रा. काशीराम तांडा नागलगाव ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्कुटीस्वार सुनील इंगोले रा. उदगीर याच्या विरोधात गुरंन ९५/२४ कलम ३२५,३२३,५०४ भादवी प्रमाणे १७ जानेवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल रमेश कांबळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात