*क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य सत्कार*
*उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह,संग्राहलय,अभ्यासिका बांधकामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याने मातंग समाजाने केले आभार व्यक्त*
*उदगीर* : उदगीर शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह,संग्राहलय,अभ्यासिका बांधकामासाठी १४ कोटी ९६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याने सकल मातंग समाज उदगीरच्या वतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ भव्य क्रेनने पुष्पहार घालुन समाजाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन समाजाचा सत्कार स्विकारला.
यावेळी बोलताना ना.संजय बनसोडे यांनी महापुरुषांच्या विचारानेच आपण सर्वजण घडलो असुन उदगीर शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार असल्याची घोषणा करुन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी निधी मंजूर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासुनची माझी ईच्छा होती की, आपण समाजाच काही तरी देण लागतो म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्रातील एक नंबरचे सभागृह, संग्राहलय व अभ्यासिका उभारायची त्यासाठी मी निवडून आल्यापासुन याचा पाठपुरावा करत होतो. ते स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे समाधान वाटत आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेवुन उदगीर मतदार संघाचा विकास करण्याचा प्रयत्न केला असुन येत्या काळात आपण सर्वांनी मला साथ द्यावी असे आवाहन केले.
यावेळी बन्सीलाल कांबळे, संग्राम अंधारे, जवाहरलाल कांबळे, अँड. विष्णू लांडगे, पप्पू गायकवाड, रवींद्र बेद्रे, बालाजी रणदिवे, अजित कांबळे, बालाजी गोटमुकले, प्रा.बिभीषण मद्देवाड,अरविंद शिंदे,विरलाल कांबळे, सतीश चव्हाण, रुपेंद्र चव्हाण, राजू सूर्यवंशी , रामेश्वर शिंदे, नेताजी कांबळे, प्रा.राम कांबळे, श्रावण थोरे, सुशिलाबाई लांडगे, शिवकर्णा अंधारे, रमा वाघमारे, उषा भालेराव, करण अंधारे, आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments