दिव्यांग व 85 वर्ष वरील मतदारांना आता घरी राहून पोस्टल मतदान करता येणार.उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे
उदगीर:विधानसभा मतदारसंघ अंतर्गत आगामी लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने पूर्व तयारी बाबत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुशांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.उदगीर विधानसभा मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी एकूण 2500 मनुष्यबळ आवश्यक आहे.त्या अनुषंगाने सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा ऑनलाईन डेटा तयार करण्यात आलेला असून लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर संबंधित मतदान अधिकारी यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या संदर्भातली सर्व तयारी करण्यात आलेली आहे तसेच विधानसभा मतदार संघ मतदार संघातील क्षेत्रांतर्गत एकुण चार चेक पोस्ट तयार करण्यात आलेले असून त्या ठिकाणी स्थायी निग्रह आणि पथक अर्थातच स्टॅटिक सर्व नियुक्त करण्यात आलेली आहे तसेच आजच्या आदर्श आचार संहितेचे पालन व्हावे यासाठी भरारी पथक,व्हिडिओ ग्राफी पथक,खर्च पथक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.उदगीर विधानसभा मतदार संघात पुरूष 162520 , स्त्री 148207 व तृतीय पंथ 20 असे एकुण 310747 मतदार संख्या असून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तसेच आदर्श मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत.भारत निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशाप्रमाणे 85 वर्ष वयावरील वयोवृद्ध मतदार तसेच दिव्यांग मतदार यांना घरून मतदान करण्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर पाच दिवसाच्या आत सर्व बीएलओ घरोघरी भेट देणार आहेत वरील संवर्गातील मतदारांनी घरी मतदान करण्याचा पर्याय निवडल्यास त्यांना फिरत्या पथकाद्वारे घरी जाऊन मतदान पोस्टल बॅलेट द्वारे मतदान करून घेण्यात येईल.
उदगीर विधानसभा मतदार संघ अंतर्गत आज नियुक्ती करण्यात आलेले जवळपास 500 कर्मचारी व अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले व पुढील मतदान होईपर्यंत युद्ध पातळीवर काम करणे बाबत निर्देश देण्यात आले.सदर प्रशिक्षणाच्या बैठकीस श्री.सुशांत शिंदे उपविभागीय अधिकारी उदगीर तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मार्गदर्शन केले व श्री.राम बोरगावकर तहसीलदार उदगीर, श्रीमती सुरेखा स्वामी तहसीलदार जळकोट,श्री.संतोष गूट्टे, नायब तहसीदार जळकोट, श्री.संतोष धाराशिवकर नायब तहसीलदार उदगीर, व श्री.राजेश खरात नायब तहसीलदार जळकोट हे उपस्थित होते.
0 Comments