Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

अखेर अवलकोंडा तळ्यातील मोटारी प्रशासनाने हटवल्या.

अखेर अवलकोंडा तळ्यातील मोटारी प्रशासनाने हटवल्या

वृत्तपत्रात व इलेक्ट्रॉनिक मिडियावर प्रसारित झालेल्या बातम्यांची प्रशासनाने घेतली तातडीने दखल.

उदगीर:तालुक्यात विविध गावांत पाणीटंचाई भासण्या अगोदर प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी बहुजन विकास अभियान संघटनेचे अध्यक्ष संजयकुमार कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती,संजयकुमार कांबळे यांनी तळ्यावरील मोटारी काढून कार्यवाही करावी अशी मागणी लावून धरली होती.

उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तळ्यात आठ दिवसच पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याच्या तक्रारी नागरिकांतून आल्याने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असता तळ्यात अत्यल्प पाणी असल्याचे दिसून आले शेतकऱ्यांने मोटारीने उपसा केल्याने तळ्यातील पाणी तळ गाठला अशा प्रकारच्या तक्रारी आल्या,तक्रारीच्या अनुषंगाने तळ्यातील पाण्याची बातमी वृत्तपत्रात व इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रसारित होताच स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले व क्षणांचाविलंब न करता २ एप्रिल रोज मंगळवारी सकाळी ११ वाजता अवलकोंडा तळ्यावर जाऊन शेतकऱ्यांना स्वतः हून मोटारी काढून घ्यावे अन्यथा मोटारी जप्त करून कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले,प्रशासनाने केलेल्या आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत तळ्यात असलेल्या आपापल्या मोटारी काढून प्रशासनास सहकार्य केले,आठ दिवस पुरेल इतकाच तळ्यात मृत साठा असल्याच्या बातम्या प्रसारित होताच प्रशासनाने तातडीने कारवाई केली, यावेळी नागलगावचे ग्रामविकास अधिकारी रोडेवाड,अवलकोंडा ग्रामसेवक घंटेवाड,नळगीर महावितरणचे अभियंता आर.जी.बिरादार,अवलकोंडा तलाठी मीना अलापुरे,नागलगाव तलाठी सोनाली पकाले,मांजरी तलाठी करेप्पा,नागलगावचे पोलीस पाटील अंकुश वाघे,पिंपरीचे पोलीस पाटील राजाराम राठोड, तंत्रज्ञ एस.बि.शिंदे,सहाय्यक महावितरण निशांत सूर्यवंशी, सहाय्यक तंत्रज्ञ आकाश तेलंगे,वरिष्ठ तंत्रज्ञ आसरे ए.एम.यांनी तळ्यावर जाऊन शेतकऱ्यांना मोटारी काढण्यास भाग पाडले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात