*श्रीराम नवमीनिमित्त क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या शुभेच्छा*
*उदगीर* : शहरात श्रीराम नवमीनिमित्त भव्य शोभा यात्रा श्रीराम प्रतिष्ठाण ट्रस्ट यांच्या वतीने उदगीर शहरातुन काढण्यात आली होती. यावेळी क्रीडा राम मंदिरात प्रभु श्री राम यांची आरती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
जन्मोत्सवानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान व अन्य सामाजिक संघटनेच्या वतीने प्रभू श्रीराम यांच्या पूर्णाकृती प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा प्रारंभ क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. • या मिरवणुकीत श्रीराम प्रतिष्ठानचे सतीश पाटील, प्रशांत मांगुळकर, आशिष अंबरखाने, अजय नवरखले, कल्लाप्पा स्वामी, संतोष फुलारी, सावन टंकसाळे, राजेश शेटकार, अक्षय जाधव, निखिल पाटील, पप्पू गायकवाड, दिनेश स्वामी, पीयूष चिदरेवार, अजय कबाडे, शुभम लोणीकर, विशाल मुंडकर, विष्णू लोणीकर, आकाश तुळजापुरे, अरविंद शिंदे यांच्यासह शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
यावेळी विविध देखावे सादर करण्यात आले.
याप्रसंगी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी उपस्थित राम भक्तांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या.
उदगीर शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध सामाजिक संघटनाकडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जय श्रीराम जयघोषात विराट मिरवणूक काढण्यात आली. श्रीराम मंदिरात ह.भ.प वरदा चाकूरकर यांचे प्रवचन झाले. यावेळी डॉ. अंबादासराव देशमुख-शेकापूरकर, अजय दंडवते, यशवंतराव बारसकर, संतोष कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, मेघश्याम कुलकर्णी यांच्यासह शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शोभा यात्रेच्या मिरवणुकीत जि. प.चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,माजी नगरसेवक विजय निटुरे, अमोल निडवदे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, अॅड. दत्ता पाटील, उत्तराताई कलबुर्गे, दिलीप गायकवाड, शिवाजी मुळे, 'मनसे'चे संजय राठोड, सेनेचे चंद्रकांत टेगेटोल,भाजपाचे बाळासाहेब पाटोदे, माजी सभापती सिध्देश्वर पाटील, सुदर्शन मुंडे, शहाजी पाटील- तळेगावकर, गणेश गायकवाड, बालाजी गवारे, जयप्रकाश नंदगावे, मोतीलाल डोईजोडे, रवी पाटील, रामदास बेंबडे, प्रा. पंडित सूर्यवंशी, महेश तोडकर, सिद्धेश्वर पटणे, अमोल भालेराव, साधू लोणीकर यांच्यासह हजारो रामभक्त
मिरवणुकीत सहभागी झाले होते.
जय श्रीराम जयघोषात ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाणपोई, सरबत, खिचडी, व प्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments