Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

युवक, क्रीडा व बंदरे विकास मंत्री माननीय संजयजी बनसोडेसह लोकांनी मस्जिद परिचय करून घेतला*

*युवक, क्रीडा व बंदरे विकास मंत्री माननीय संजयजी बनसोडेसह लोकांनी मस्जिद परिचय करून घेतला*

उदगीर: शहरात दरवर्षी इफ्तार कार्यक्रमाची सुंदर परंपरा आहे. शेख जानीभाई, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित  इफ्तार पार्टी कार्यक्रमात माननीय मंत्री महोदयांनी उपस्थिती नोंदवली. इफ्तार नंतर लागलीच सर्व मान्यवर मस्जिदीचे अंतरंग पाहण्यासाठी मकबरा नवाबान या मस्जिदित प्रवेश केला. यावेळी अब्दुल मुजीब यांनी मस्जिद अरबी भाषेतील सजदा या शब्दापासून बनला असल्याचे सांगितले. सजदा म्हणजे साष्टांग नमस्कार. ज्या ठिकाणी ईश्वराकरिता सामूहिकरीत्या साष्टांग नमस्कार केला जातो ते ठिकाण म्हणजे मस्जिद अशी त्यांनी मस्जिदीची व्याख्या सांगितली. दिवसातून पाच वेळा दिल्या जाणाऱ्या अजानचा अर्थही त्यांनी सांगितले. अजान ही नमाजची वेळ झाल्याने मस्जिदीकडे या ही हाक देण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. मस्जिदीत कोठेही चित्र किंवा मूर्ती नसते. भारतातील सर्व मुस्लिम बांधव पश्चिमेकडे तोंड करून नमाज पठण करतात आणि अमेरिकेतील लोक पूर्वेकडे तोंड करतात. अरबस्थानातील मक्का हे शहर पृथ्वीच्या केंद्रस्थानी आहे. त्या केंद्रस्थानी असलेल्या काबागृहाकडे तोंड करून लोक नमाज पठण करतात. कखबागृह हे एकेश्वरवादाचे केंद्र आहे. मानवी एकतेचे केंद्र आहे, असेही त्यांनी सांगितले. मस्जिदीचा उपयोग लोकांची मने स्वच्छ करण्याकरिता होतो. आधुनिक काळात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सोयही मस्जिदीतून केली जाते. आयएएस, आयपीएस अधिकारी हे मस्जिदीत अभ्यास करूनही बनत असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात माननीय संजयजी बनसोडे साहेब, माजी आमदार माननीय गोविंदजी केंद्रे, राजेश्वरजी निटुरे, भदंत नागसेनजी, उमाकांत पाटील, मौलाना अजीजूर रहमान व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख जानीभाई शेख फैयाज भाई, शेख अजहरोद्दीन व व मित्रमंडळींनी परिश्रम घेतला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात