गायमाळ तांडा येथे एकाचे दगडाने डोके फोडले; दोघांविरुध्द गुन्हा..
उदगीर तालुक्यातील गायमाळ तांडा (जानापूर) येथे शुल्लक कारणावरून एकाला दगडाने मारुन डोके फोडले. याप्रकरणी मंगळवारी (२ एप्रिल) दुपारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.३१ मार्च रोजी दुपारी गायमाळ तांडा येथे फिर्यादीच्या घरात आरोपीने फिर्यादीस हे घर मी बांधलो आहे असे म्हणून शिवीगाळ करून, दगड हातात घेवून फिर्यादीचे डोके फोडून जखमी केले व फिर्यादीचे पतीच्या शर्टाला धरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी लता वासुदेव चव्हाण (रा. गायमाळ तांडा, जानापूर ता.उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात नामदेव भानुदास चव्हाण, संगिता नामदेव चव्हाण (दोघेही गायमाळ तांडा, जानापूर, ता. उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.
0 Comments