Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

आचारसंहितेचे पालन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी,पोलीस अधीक्षक सोमय मुंढे

आचारसंहितेचे पालन करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी,पोलीस अधीक्षक सोमय मुंढे

प्रतिनिधी/संदेश कांबळे
उदगीर:लातूर जिल्हा पोलीस दल व उदगीर शहर पोलीस ठाणे व उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या वतीने ६ एप्रिल रोज शनिवारी १२ वाजता उदगीर येथील परमेश्वरी मंगल कार्यालयात सर्वसमावेश शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला लातूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंढे हे उपस्थित होते. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नागरिकांना आवाहन केले की,एप्रिल महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान ईद,श्रीराम नवमी साजरी करताना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून जयंती  सण उत्सव साजरा करावा,पालकांनी आपल्या मुलाकडे असलेल्या मोबाईलवर बारकाईने लक्ष ठेवावे कारण मुले शोसल मीडियावर समाजाच्या भावना दुखावतील अशा वादग्रस्त पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला माहीत नसते म्हणून,प्रत्येक नागरिकांनी आपापल्या मुलांवर लक्ष ठेवावे असे आवाहन बैठकीत बोलताना केले.उपजिल्हाधिकारी शुशांत शिंदे यांनी बोलताना सांगितले की,जयंतीचे परवाने एक दिवसात  मागणीनुसार दिले जातील,डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीकडून आलेल्या सर्व सूचनेचे पालन प्रशासन पुर्ण करून देईल,त्याच बरोबर रमजान ईदची नमाज पठण करण्यासाठी ईदगाह मैदान व परिसरात मुस्लिम बांधवांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पूर्ण मैदान व परिसरात मंडप उभारण्यात येईल, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था,आरोग्य विभागाचे पथक,अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले,बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थित नागरिकांना मतदानाची शपथ दिली,व राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप केला.यावेळी तहसीलदार राम बोरगावकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख,पोलीस निरीक्षक अरविंद पवार,पोलीस निरीक्षक करण सोनकवडे,मुख्याधिकारी सुंदर बोंदर,महावितरणचे मुख्य अभियंता दराडे,प्रा झुंगा स्वामी, आदी उपस्थित होते.यावेळी उदगीर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments

जाहिरात