*निवडणूक निरीक्षक (पोलीस) यांनी केली मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी*
लातूर, दि. 21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून भारत निवडणूक आयोगाने शशांक जायस्वाल यांची नियुक्ती केली असून त्यांनी शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे तयार करण्यात आलेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, तहसीलदार सौदागर तांदळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतदान यंत्र सुरक्षा कक्ष, मतमोजणी कक्ष आणि परिसराची श्री. जायस्वाल यांनी यावेळी पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेवून त्याबाबत सूचना दिल्या. सुरक्षा कक्ष लवकरात लवकर सज्ज करण्याबाबत कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
*विविध स्थिर निगराणी पथकांना दिली भेट*
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या लखमापूर आणि बर्दापूर येथील स्थिर निगराणी पथकांना निवडणूक निरीक्षक (पोलीस) शशांक जायस्वाल यांनी भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत उपस्थित होत्या. स्थिर निगराणी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी कामकाजाची माहिती दिली.
*****
0 Comments