प्रापर्टीच्या हिस्स्यासाठी काठीने मारहाण; तिघांविरुध्द गुन्हा दाखल
उदगीर शहरातील विकासनगर भागात प्रापर्टीचा हिस्सा दे म्हणून काठीने डोक्यात मारुन जखमी केले. ही घटना शनिवारी (४ मे ) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार. दुपारी शहरातील विकास नगर येथे आरोपीनी संगनमत करुन फिर्यादिस आम्हाला, आमचे प्रापर्टीचा हिस्सा दे म्हणुन लाथाबुक्यांनी व वेळुचे काठीने डोक्यात, हातवार मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून आम्हाला प्रापर्टीचा हिस्सा नाही दिला तर तुला जिवे मरून टाकु असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सुनील दादाराव कांबळे यांचे (रा. विकास नगर देगलूर रोड उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात विनोद दादाराव कांबळे, सतिष दादाराव कांबळे, अनिल दादाराव कांबळे, (सर्व रा.विकास नगर उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल पुठेवाड हे करीत आहेत.
0 Comments