शेतकरी,शेतमजूर,कामगारांच्या मदतीसाठी लढणारी एकमेव बहुजन विकास अभियान संघटना,ज्योती ऐकूर्केकर यांचे प्रतिपादन
उदगीर:शेतकरी.शेतमजूर.
कामगार.दिव्यांग.निराधार.यांच्या न्यायासाठी वेळोवेळी निवेदने.आंदोलन.मोर्चा.निषेध.आमरण उपोषणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सतत ३५ वर्षांपासून बहुजन विकास अभियान संघटना कार्यरत आहे, बहुजन अभियान संघटनेने आजपर्यंत अनेकांना न्याय मिळवून दिला आहे,जनतेच्या हक्कासाठी सर्वात जास्त आंदोलन करणारी संघटना म्हणजे बहुजन विकास अभियान संघटना आहे,असे प्रतिपादन महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती संजयकुमार ऐकूर्केकर यांनी बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केल्या,ते संघर्ष नगर उदगीर येथील कार्यालयात बोलत होत्या,शेतकऱ्यांचा पीक विमा असेल,बी बियाणे खतांच्या किमती असेल,अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असेल,ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ असेल,मजुरदारांच्या घरकुलाचा प्रश्न असेल,उदगीर शहरात कामगार भवनाचा प्रश्न असेल,उदगीर शहरातील नागरी समस्या असेल,निराधारांचे वेळेवर अनुदान देणे, अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी मिळणे,नागरी समस्या ते शेतकरी,शेतमजूर,कामगार,मजुरदारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी असे अनेक विविध प्रकारच्या समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी बहुजन विकास अभियान संघटना सदैव तत्पर असून यापुढेही त्यांचे कार्य असेच चालू राहणार असून सर्वात जास्त आंदोलने करणारी संघटना म्हणून उदगीरच्या इतिहासात नोंद होईल असेही ज्योती ऐकूर्केकर यांनी बोलताना संघटनेचा अनुभव व्यक्त केला.पुढे बोलताना म्हणाल्या की संघटनेच्या पदाधिकाऱ्यामुळे संघटनेचे नाव आज राज्यात झाले आहे,संघटनेच्या आंदोलनाची दखल शासनानेही घेतली आहे संघटनेचे काम असेच चालू राहू द्यावे असेही त्या बोलताना म्हणाल्या, यावेळी बहुजन विकास अभियान अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे, ज्ञानेश्वर पवार,लक्ष्मण आडे,पप्पू शेवाळे,गंगाधर शेवाळे, नरसिंग गुरमे,राजकुमार गाथाडे, अमोल सूर्यवंशी,राजकुमार कारभारी,गोरख वाघमारे,जावेद शेख,आकाश पाटील,मोहन पाटील,आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते, बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली,
0 Comments