बनशेळकी रोड परिसरात लहान भावाने प्रॉपर्टीच्या वादातून आई व भावावर केला कोयत्याने वार
उदगीर शहरातील बनशेळकी रोड येथे लहान भावाने आई व मोठया भावावर कोयत्याने वार केल्याची घटना ३० मे रोज गुरुवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे, घराची वाटणी करून दे म्हणत संगीता बाबासाहेब बनशेळकीकर यांचा लहान मुलगा सिद्धार्थ बाबासाहेब बनशेळकीकर वय २५ वर्ष याने त्यांचा मोठा भाऊ सचिन बाबासाहेब बनशेळकीकर वय ३० वर्ष,व आई संगीता बाबासाहेब बनशेळकीकर वय ५० वर्ष या दोघांना ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून जीवघेणा हल्ला केला, मुलाने आईच्या डोक्यात कोयत्याने वार करून भावाच्याही डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले आहे,या हल्ल्यात आई व मुलगा गंभीर जखमी झाले असून दोघांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे,याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले,घराचा हिस्सा दे म्हणत लहान मुलाने त्याच्या आई व भावावर वार करुन जीवघेणा हल्ला केला.
0 Comments