अवलकोंडा येथे घरासमोरील लाकडे हटविण्याच्या कारणावरून लोखंडी राॅडने मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा दाखल
उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे घरासमोरील लाकडे काढून घेण्यावरुन उदभवलेल्या वादातून लाकडाने व लोखंडी राॅडने मारुन जखमी केले. याप्रकरणी शुक्रवारी ३१ मे रात्री उशिरा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.३१ मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास अवलकोंडा येथे आरोपीनी संगणमत करून फिर्यादीचे घरासमोरील लाकडे काढून घेण्याचे कारणावरून शिवीगाळ करून फिर्यादीस लाकडाने पाठीत मारहाण केली. व तसेच चंद्रकांतने पंचने डोक्यात मारून दुखापत केली. तसेच बालाजी याने लोखंडी राॅडने फिर्यादीचे उजव्या दंडावर मारून दुखापत केली व सदरचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची बहीण आलीस असता तिला सुमित्राने शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. व सर्वांनी मिळून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी रामेश्वर रमेश भालेराव रा. अवलकोंडा ता. उदगीर यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पुंडलिक ग्यानोबा भालेराव, चंद्रकांत पांडूरंग सोनकांबळे, बालाजी ग्यानोबा भालेराव, सुमित्रा पुंडलिक भालेराव सर्व रा. अवलकोंडा ता. उदगीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.
0 Comments