Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतमोजणी कक्षातील तयारीचा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतला आढावा

मतमोजणी कक्षातील तयारीचा उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी घेतला आढावा

लातूर, दि. ०१ : मतमोजणी कक्षातील पूर्वतयारीची उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी ३० मे रोजी दिलेल्या सूचनांनुसार करण्यात आलेल्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला. 

लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, निवडणूक नायब तहसीलदार पंकज मंदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बी. डी. कांबळे, प्रा. नितीन आगावणे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रदीप डूमणे यावेळी उपस्थित होते.

विधानसभा क्षेत्रानिहाय मतमोजणी कक्षातील मतमोजणी टेबल व्यवस्था, टेबल क्रमांक आणि उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांची बैठक व्यवस्था, मतमोजणी आकडेवारीसाठी नियुक्त पथकाची बैठक व्यवस्था, व्हीव्हीपॅट स्लीप मतमोजणी व्यवस्था, टपाली मतदान मोजणी कक्ष आदी विविध बाबींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ठाकूर- घुगे यांनी अनुषंगिक सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या अंमलबजावणीचा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी आढावा घेतला.

Post a Comment

0 Comments

जाहिरात