संघर्ष योद्धा चित्रपटाचे अभिनेते रोहन पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सत्कार
उदगीर: मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा हा चित्रपट निर्मिती करणारे चित्रपट अभिनेते रोहन पाटील व संघर्ष योद्धा चित्रपटात अभिनेत्रीची भूमिका बजावणारी जानवी तांबे २ जून रोज रविवारी उदगीर शहरात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले असता त्यांचा उदगीर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शाल व पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सत्कार करण्यात आला,यावेळी शहाजी पाटील तळेगावकर,छावाचे दत्ता पाटील, सतीश पाटील मानकीकर,अंकुश ताटपल्ले पाटील,यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments