Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्र, धर्माच्या सशक्तीकरणात वीरशैव-लिंगायत धर्माचे भरीव योगदान - डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य

राष्ट्र, धर्माच्या सशक्तीकरणात वीरशैव-लिंगायत धर्माचे भरीव योगदान - डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य 

उदगीर ही पवित्र भूमी; उदगीरच्या धर्मसभेत काशीपीठ जगद्गुरुंचे गौरवोद्गार

उदगीर (प्रतिनिधी) : उदयगिरी ही पवित्र भूमी आहे. वीरशैव-लिंगायतांचे उदगीर येथील श्री. हावगीस्वामी मठ हे शिव उपासनेचे मुख्य केंद्र आहे. तत्कालीन सर्व शिवाचार्यांनी समाजोपयोगी महान कार्य केले असून राष्ट्र आणि धर्माच्या सशक्तीकरणात वीरशैव-लिंगायत धर्माने भरीव योगदान दिले असल्याचे प्रतिपादन काशी पिठाचे जगद्गुरु श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केले. उदगीरचे आराध्य दैवत सद्गुरु श्री. हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण व ५०५१ सद्भक्तांचा भव्य ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्याच्या आज (ता. १७) पाचव्या दिवशी आशीर्वाचनप्रसंगी ते निरुपण करत होते. 

श्री सद्‌गुरू हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा निमित्त बिदर रेल्वे गेट जवळील मठाच्या भव्य जागेत अखंड शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथाचे पारायण शिवपाठ, गाथा भजन आदी कार्यक्रमाच्या पाचव्यादिवशी   आयोजित   धर्मसभेत   काशीपीठाचे जगदगुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य  महास्वामीजीनी भक्तांना अमृतोपदेश केला.
व्यासपीठावर जयशांतलिंगूश्वर महास्वामीजी हिरणगावा,विरपाक्ष शिवाचाचार्य माजंरसुंबा,सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा,सिध्दलिंग महास्वामी देवणी, हेडगापूर देवणी रहटकल,चन्नमल्ल महास्वामी हुडगी,औकार शिवाचार्य महाराज जगंमवाडी,पंडिताराध्य शिवाचार्य  हळीखेड, महादेव शिवाचार्य महाराज वाईकर,शिवानंद महास्वामी सायगाव,उमाकांत देशिकेंद्र महाराज डोणगाव आदी शिवाचार्य  महाराज   प्रारंभी श्री गुरु हावगीस्वामी मठसंस्थानच्यावतीने मठाधिश डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज व  मंदिर समीतीच्यावतीने माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, उध्दव महाराज हैबतपुरे, सुभाष धनूरे यांनी जगदगुरुंचे स्वागत करुन आशिर्वाद घेतला.
श्री गुरु हावगीस्वामी मठसंस्थानचे मठाधिश  श्री. श्री. १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी  मठाच्यि माध्यमातून घेण्यात येत असलेल्या विविध धार्मिक सामाजिक उपकृमाची माहिती सांगून भक्तांच्या सहकार्यामुळेच  सुवर्ण कलशारोहण  सोहळा संपन्न होत असल्याचे सांगीतले व शिवनाम सप्तिह,परमरहस्य ग्रंथ पारायण सोहळ्याच्या उपकृमाची रुपरेषा सांगितली. 
आपल्या अमृततुल्य वाणीतून निरुपण करताना जगद्गुरु डाॅ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी पुढे म्हणाले की, मोठ्या पदावर बसण्यात मोठेपणा नाही तर मोठ्या गादीवर, मोठ्या पदावर बसल्यावर मोठे कार्य करण्यात खरा मोठेपणा आहे. कुसंगतीने माणूस खुजा होतो आणि सुसंगतीने माणूस उल्लेखनीय उंचीवर पोहचतो. शिवनामाचा महिमा अगाध आहे. 
शरीर हे अन्नमय कोष असून अन्न हे परब्रह्म आहे.  सात्विक अन्नाचे सेवन केल्यास सात्विक कार्य हातून घडतात. योग्य आहाराप्रमाणेच शुचिर्भूत होण्याचे महत्त्वही जगद्गुरु महास्वामीजींनी यावेळी विशद केले. माणसाने दातृत्वाचा गुण अंगी बनावे. यथाशक्ती दान करणे हा कलियुगातील धर्म आहे, असेही ते म्हणाले. शिवनाम सर्व रोगांवरील महत्वपूर्ण रसायन आहे.
शिवनाम हे पापमोक्षाचे पहिले कवाड आहे. पापक्षालन झाल्याशिवाय शरीर शुद्ध होत नाही. शुद्ध शरीर आणि शुद्ध आत्म्यासाठी शिवनाम महत्त्वाचे साधन आहे. शिवनाम केल्याने चार वेदांचे पारायण घडते. यास्तव श्रद्धापूर्वक शिवनाम घ्यावे, असे आवाहन जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य यांनी केले. श्री. श्री. १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांचा सर्वांशी स्नेह असून ते एक उत्तम समन्वयक आहेत. हावगीस्वामी मठाला मठाधीश शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनीच गतवैभव प्राप्त करून दिले असल्याचीही पुष्टी श्री. श्री. १००८ काशी जगद्गुरु महास्वामीजींनी जोडली. 
    दरम्यान बिजकुंदा येथील सोमलिंग शिवाचार्य महाराज, मांजरसुंबा येथील वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांनीही भाविकांना आशीर्वचन दिले. श्री. श्री. १०८ ष. ब्र. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले की, संताचे अभंग विचार मानवी जीवन समृद्ध करतात. स्वतः संतोषाने राहून इतरांना संतोष देणे, इतरांच्या भावना समजून घेणे हीदेखील एक प्रकारे इष्टलिंग पूजा असल्याचे चिंतन श्री. विरुपाक्ष शिवाचार्यांनी मांडले.
   जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामीजींच्या रुपाने वाराणसीतील पवित्र ज्ञानगंगा उदगीरला आल्याने  सह महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र,तेलंगणा राज्यातील भाविकासह    पंचक्रोशीतील  उदगीर, वाढवणा (बु.), मोघा, देवणी, वलांडी, देवर्जन, शेकापूर, नागलगाव, कौळखेड, अहमदपूर, जळकोट, लोहारा, मादलापूरसह लातूर सह मराठवाड्यातील  हजारो भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते. 
यावेळी   जगदगुरुंची अमृतवाणी ऐकण्यासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता.
या कार्यक्रमासाठी संगीताच्या माध्यमातून सादर केलेल्या शिवभक्तीगितावर  उपस्थित भक्तगण तल्लीन झाले होतू संगीत सेवा  स्वरमणी सोमनाथ किडिले, हावगी पन्नासे कवठेकर, तबलावादक हारुताई सुतार ,बाबुराव धुळसेट्टे, भिमाशंक भुरे यांनी  सादर केली.

Post a Comment

0 Comments

जाहिरात