वीरशैव-लिंगायत धर्मात समतेचा निनाद - जगद्गुरू वीरसोमेश्वर शिवाचार्य
उदगीर (प्रतीनिधी) : परमात्म्याचे चैतन्यदायी रूप असणाऱ्या शिवसंप्रदायात गतिशीलतेला, कृतिशीलतेला विशेषत्वाने वाव असून वीरशैव-लिंगायत धर्मात समतेचा विचार साकल्याने झाल्याचे प्रतिपादन रंभापुरी पिठाचे जगद्गुरू वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. श्री सद्गुरू हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा निमित्त बिदर रेल्वे गेटजवळील मठाच्या जागेत उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपात अखंड शिवनाम सप्ताहानिमित्त श्री परमरहस्य ग्रंथाचे पारायण, शिवपाठ, गाथा भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन सोमवार दिनांक १३ मे पासून सुरू झाले आहे. कार्यक्रमाच्या तीसऱ्या दिवशी आयोजित धर्म सभेत स्वामीजींनी वरील प्रतिपादन केले. पुढे विवेचन करताना स्वामीजी म्हणाले क, वीरशैवांनी आपली धर्म संस्कृती जोपासून धर्माचरण करावे. समाजहिताला प्राधान्य द्यावे.
श्रीगुरू हावगीस्वामी मठाचे भक्त श्री व सौ विठ्ठलराव माकणे परिवाराच्यावतीने जगद्गुरूजींचे पाद्दपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मठ संस्थानच्या वतीने मठाधीश डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराजांनी जगद्गुरूंचे पुष्पमाला अर्पण करून स्वागत केले, आशीर्वाद घेतला.
याप्रसंगी मठसंस्थानचे पदाधिकारी सुभाष धनुरे, शिवराज नावंदे गुरूजी तसेच विजयकुमार निटुरे ,रूकारी सेठ पुणे, शिवकुमार गुळंगे, अहमदपुरच्या नगराध्यक्षा सौ. कासनाळे आदींनी स्वागत केले. धर्मसभेस विविध शिवाचार्य मंडळी यात ष.ब्र. शिवयोगी शिवाचार्य महाराज आणदुर, ष.ब्र. महादेव शिवाचार्य महाराज, शांतलिंगेश्वर महास्वामी विरक्त मठ हिरेनागाव, ष. ब्र. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, सिध्द- लिग महास्वामी देवणी, सिध्दओंकार शिवाचार्य महाराज जंगमवाडी, म.नि. प्र. संगनबस्व महास्वामी निलंगा,म.नि.प्र. गंगाधर महास्वामी जेवळीकर, चन्नमल्ल महास्वामी हुडगी, मुरगेंद्र महास्वामी चांबाळ, आदी शिवाचार्य गण उपस्थित होते.
यावेळी आपल्या अमृतवाणीतून उपदेश करताना म्हणाले, जगदगुरु म्हणाले की, परमरहस्य हा भक्तीरस प्रधान ग्रंथ आहे. वीरशैव साधकाला सहजसुंदर, प्रासादिक शैलीत श्रीमन्मथ स्वामीनी परमरहस्य ग्रंथ ओवीबद्ध करून वीरशैव लिंगायत धर्मावर अनंत उपकार केले आहेत. परमरहस्य ग्रंथ हा सिद्धांत शिखामणी, उपनिषद, शैव पुराण, शैव आगम आणि वेद यांचे सार आहे. परमरहस्य ग्रंथ आणि जगदुरु बसवण्णांचे तत्वज्ञान वीरशैवांच्या
आदर्श जीवन पद्धतीचा मूलाधार असल्याचे प्रतिपादन रंभापुरी पीठाचे म हास्वामी श्री श्री श्री १००८ जगदुरु वीरसिंहासनाधीश्वर डॉ. वीसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. मठाधिपती डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराजांच्या अधिपत्याखाली उदगीर मठाची उत्कृर्षाकडे वाटचाल सुरू असून शंभूलिंग शिवाचार्य महाराजांच्या स्वभावात साधेपणा असून महान कार्य करणारे असुन रंभापुरी पीठाअंतर्गत सर्वात मोठे शाखा मठ असलेले श्री हावगीस्वामी मठ हे यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. या मठावर एका अभ्यासु शिवाचार्यांचा पठ्ठाभिषेक करून हावगी स्वामी मठाच्या संपूर्ण संर्वांगिण विकासासाठी रंभापुरी पीठाने संपुर्ण अधिकार दिले असुन डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज याच्या मार्गदर्शनाखाली मठाच्या विकासासाठी होत असलेले कार्य गौरवास्पद असुन डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी वीरशैव समाजाला जागृत करण्याचे काम शिवनाम सप्ताह परमरहस्य ग्रंथाचे पारायण शिवकिर्तन सप्तकोटी शिवनाम जप आदी कार्यक्रमाच्या माध्यमातुन करण्यात येत असलेले कार्याबध्दल गौरव करून जीवनात खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्तीसाठी शिवनाम जप मंत्र आहे. वीरशैव समाज बांधवांनी आपल्या वीरशैव संस्कृतीचे जिवनात आचरण करावे असे आव्हान करून उदयगिरी भुमी ही पावन भुमी आहे. ज्या प्रमाणे कर्नाटकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी वचन साहित्याच्या माध्यमातुन कार्य केले. त्याच प्रमाणे संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी आदर्श जिवन पध्दती कशी असली पाहिजे याचा उपदेश परमरहस्य ग्रंथातुन दिला आहे. समाजाला जागृत करण्याचे कार्य या दोन्ही महान विभुतींनी केल्याचे सांगितले. ते एक महातपस्वी असल्याचे गौरोउद्गार रंभापुरी पीठाच्या महास्वामीजीनी काढले.
भाविक भक्तांना आपल्या अमृतवाणीतून बोधामृत पाजताना महास्वामीजी पुढे म्हणाले की, षढाक्षर मंत्र हा महान असा तारक मंत्र असून पूर्व काळापासून आणि येणाऱ्या अनेक शतकांपर्यंत शिवधर्म हा परमात्म्याची चैत्यदायी शक्ती बनून मानवी जीवनाला कृपांकित करण्याची नैसर्गिक, अध्यात्मिक क्षमता असणारा सर्वश्रेष्ठ धर्म, आदर्श संप्रदाय असल्याचेही ते म्हणाले.
प्रास्ताविकात डॉ. शंभुलिंग शिवाचाय महाराज यांनी श्रीगुरू हावगीस्वामी मठाच्या माध्यमातुन केलेल्या कार्याची माहिती सांगुन हे केवळ भक्तांच्या सहकार्यामुळेच श्रीगुरू हावगीस्वामी मंदिराचा सुवर्णकलश सोहळा होत आहे. असुन यापुढील काळात डोंणगाव येथील मठाच्या जिर्णोध्दार व सुवर्णकलश सोहळा अडीच कोटी रूपयाच्या भक्तांच्या मदतीतुन पुढील एक वर्षात पुर्ण करण्याचा संकल्प केला. यावेळी हावगीस्वामी महिला मंडळ व युवक मंडळाच्या वतीने जगद्गुरचे स्वागत करण्यात आले टाळ, मृदगाच्या गजरात पाउले खेळत मुख्य व्यासपिठावर आगमण झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ष.ब्र.महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांनी केले तर आभार विरभद्र स्वामी यांनी मांडले.
0 Comments