श्री हावगीस्वामी मंदिर कळसारोहणनिमित्य आयोजित रक्तदान शिबिरात २१०० रक्तदात्यांचे योगदान
उदगीर(प्रतिनिधी)श्री हावगीस्वामी मंदिर कळसारोहणनिमित्य आयोजित रक्तदान शिबिरात २१०० रक्तदात्यांचे योगदान रक्तदान करुन रक्तदानाच्या सामाजिक राष्ट्रिय कार्यात सहभाग नोंदवला तर यात महिलांचा उत्सफुर्त सहभाग नोंदवला.
सद्गुरू हावगीस्वामी मंदिर सुवर्ण कलशारोहण सोहळा निमित्त बिदर रेल्वे गेट जवळील हावगीस्वामी शेतमळा येथील भव्य जागेत अखंड शिवनाम सप्ताह निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मठाचे मठाधिश डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी सध्या उन्हाळा असल्याने रक्ताची मागणी वाढली आहे परंतू ब्लड बॅंकेत रक्ताचा तुटवडा असल्याने धार्मिकते बरोबरच सामाजिक जाणावीने कै.नागप्पा अंबरखाने ब्लडबॅंकेच्या सहकार्याने शनिवार दि.१८ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन ष.ब्र. सिध्देश्वर शिवाचार्य महाराज, म.नि.प्र संगनबसव महास्वामी निलंगायांच्या हस्ते झाले यावेळी नागप्पा ब्लड बॅंकेचे डाॅ.सिद्राम शेटकार उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरात हावगीस्वामी युवक मंडळाचे युवक, तसे चया शिबिरात महिला शिवभक्तांनी उत्सफुर्तपणे रक्तदान करुन महिलाही रक्तदानात मागी नाहीत हे दाखवून दिले आहे.सर्वरोग निदान शिबिरास उत्सफुर्त सहभाग २१०० शिवभक्तानी घेतला लाभ
श्री गुरु हावगीस्वी मंदिर सुवर्ण कळसारोहण सोहळ्यानिमित आयोजित सर्व रोगनिदान शिबिरात शिवभक्तानी लाभ घेतला सप्ताहात २१०० महिला पुरुष अबाल वृध्दांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे उदघाटन डाॅ.शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले.
आरोग्य सेवेसाठी डॉ. पुष्कराज बिराजदार ,डॉ . शैलेश मठपती ,डॉ. निरज.ब.बिराजदार ,डॉ. दत्ता पवार ,डॉ. रुपाली बावगे ,डॉ. यशोदिप मोरे ,डॉ. अभय देशपांडे ,डॉ. महेश धुमाळे ,डॉ. निलेश बावगे ,डॉ. विश्वनाथ डांगे ,डॉ. स्मृती.ब.स्वामी. ,डॉ. राधीका.वि. बिराजदार ,डॉ. मृत्युजंय वंगे ,डॉ. नेहा.सं.मुसने ,डॉ. व्यंकटेश मलगे ,डॉ. गौतमी बांगे ,डॉ. विजय बिराजदार ,डॉ. संगमेश्वर सिध्देश्वरे ,डॉ. रामेश्वर चोले ,डॉ. जगदीश रावीकर ,डॉ. बस्वराज स्वामी ,डॉ. संदीप मुसने डॉ. गोविंद बरुरे,डॉ. संतोषी मलगे यांनी सेवा केली.
0 Comments