अवलकोंडा येथे किराणाच्या उधारीवरुन काठीने, दगडाने मारहाण; चौघांविरुध्द गुन्हा..
उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे किराणा मालाच्या उधारीचे पैसे मागणीसाठी गेल्या असता लाथाबुक्याने, वेळूच्या काठीने आणि दगडाने मारुन जखमी केले. याप्रकरणी शनिवारी (१८ मे) सायंकाळी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१५ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अवलकोंडा येथे आरोपीनी संगनमत करुन फिर्यादी ही किराणा दुकानाचे उधारीचे पैसे मागण्यासाठी गेली असता तुझे कशाचे पैसे म्हणुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली व नागेश बिरादार यांनी वेळुच्या काठीने दोन्ही हातावर, पाठीवर मार देवुन जखमी केले व वामन बिरादार यांनी हातात दगड घेवुन फिर्यादीचे डोक्यात मारुन रक्त काढुन जखमी केले तु जर परत पैसे मागण्यासाठी आलीस तर तुला खतम करतो म्हणुन धमकी दिली.
याप्रकरणी जनाबाई भगवानराव गुडसुरे (वय : ५५ वर्षे व्यवसाय : किराणा दुकान रा. अवलकोंडा ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात स्मिता श्रीधर बिरादार, श्रीधर वामन बिरादार, नागेश श्रीधर बिरादार,वामन देवराव बिरादार (सर्व रा. अवलकोंडा ता.उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.
0 Comments