उदगिरात झोपेत असलेल्या पत्नीच्या कपाळावर हतोड्याचा घाव; पतीविरुध्द गुन्हा..
उदगीर संजय नगर भागात झोपलेल्या पत्नीच्या कपाळावर व डोकीत पतीने हतोड्याने घाव घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी मंगळवारी (२७ ऑगस्ट) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२३ ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास पतीने झोपी गेलेल्या पत्नीच्या भर कपाळावर व डोक्यात हतोड्याने घाव घालून गंभीर जखमी करुण बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पत्नीस रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळून गेला.
याप्रकरणी संगीता मनोहर मुद्दे (रा संजयनगर, उदगीर ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२२८/२०२४ कलम ११८(१),३५१(२)(३) भारतीय न्याय सहिंता नुसार मनोहर अण्णाराव मुद्दे (रा संजयनगर, उदगीर ता. उदगीर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाॅस्टेबल गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments