बैल धुताना एक जण गेला पुराच्या पाण्यात वाहून,ढोर सांगवी येथील घटना
जळकोट तालुक्यातील ढोर सांगवी येथे बैल धुताना एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना १ सप्टेंबर रोज रविवारी दुपारी घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ढोरसांगवी येथील कृष्णा उर्फ नरेश अशोक पाटील वय २४ वर्ष हे बैल पोळा सणा निमित्ताने दुपारी ढोर सांगवी जवळ जिरगा गावाला जाणाऱ्या ओढ्यावर बैल धुताना अचानक ओढ्याला पूर आल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.या घटनेमुळे ढोरसांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.२ सप्टेंबर रोजी पोळा असल्याने ते ओढ्यावर बैल धुण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे.
0 Comments