विद्यार्थ्यांच्या कायम पाठीशी असलेले विद्यार्थी प्रिय विश्वजित गायकवाड
उदगीर : आपल्या इंजि. अनिलकुमार गायकवाड फाऊंडेशन चे माध्यम द्वारे विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे , नौकरी ,व्यवसाय करून स्थिर व्हावे यासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असे शालेय साहित्य , शिलाई मशीन , रोजगार मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांच्या कायम पाठीशी विश्वजित गायकवाड यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे .
केवळ उदगीर तालुक्यातच नव्हे तर देवणी , शिरूर अनंतपाळ , लातूर , ठाणे , मुंबई आदी ठिकाणी ३०हजार पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग , टी शर्ट , वही , पेन्सिल , गरीब विद्यार्थिनी तथा महिलांना शिलाई मशीन , सुशिक्षित तरुणांना रोजगार मार्गदर्शन करीत व्यवसाय साठी कर्ज , पुणे मुंबई येथे कंपनी मध्ये नौकरी मिळवून दिल्याने गाव खेड्यात उत्साहात स्वागत होत आहे . बालका पासून ज्येष्ठ नागरिक यांचा त्यांच्या भोवती गराडा पडलेला असतो .
कसलेही खोटी आश्वासन , प्रलोभन न देता आवश्यक अशी मदत शक्यतो केली जात असल्याने विद्यार्थी त्यांना पाहताच विश्वजीतदादा म्हणून जोर जोऱ्यात ओरडुन आपल्याकडे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत .
निष्पाप निरागस अशा या लहान मुलांचे प्रेम पाहून विश्वजीत गायकवाड भारावून जातात . लहान मुलांत रमणारा तरुण नेता म्हणून विश्वजीत गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे.
पोलिसांच्या मुलांनाही हवी विश्वजीत दादाचीच स्कूल बॅग
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांस देण्यात आलेली आकर्षक अशी स्कूल बॅग आपल्याला ही पाहिजे असा हट्ट पोलिसांच्या मुलांनी धरला . बाजारात कोठेही प्रत्यक्षात तशीच बॅग कशी मिळणार ? सेम टू सेम बॅग चा मुलांच्या हट्ट यामुळे पोलीस हतबल . अखेर ही गोष्ट कार्यकर्त्यांद्वारा विश्वजीत गायकवाड यांना समजली . पोलिसांच्या मुलांना अर्थातच शालेय विद्यार्थ्यांना विश्वजीत गायकवाड यांनी स्कूल बॅग चे वाटप केले . यावेळी मुलांनी दाखविलेला उत्साह आणि बॅग प्राप्त करून घेण्यासाठी घातलेला गोंधळ हा एक सोहळा ठरला .
0 Comments