Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*उदगीरमध्ये ४ सप्टेंबर रोजी महिलांचा आनंद सोहळा; लातूर जिल्हा प्रशासनामार्फत जय्यत तयारी सुरु !*

*उदगीरमध्ये ४ सप्टेंबर रोजी महिलांचा आनंद सोहळा; लातूर जिल्हा प्रशासनामार्फत जय्यत तयारी सुरु !*

लातूर, दि. ३१ : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे, यासाठी विविध शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ मिळालेल्या महिलांचा आनंद सोहळा 4 सप्टेंबर रोजी उदगीर शहरातील महाराष्ट्र उदयगिरी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरु आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्याकडून याबाबत सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. वाहतूक, बैठक व्यवस्थेसह सर्व आवश्यक बाबींकरिता नेमण्यात आलेल्या पथकांकडून पूर्वतयारी वेगाने सुरु आहे.

कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली मिळण्यास मदत होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजना यासारख्या विविध योजनांमधून महिलांच्या स्वप्नांना बळ देवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.

*बुध्द विहार उद्घाटनालाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती*

उदगीर येथे उभारण्यात आलेल्या बुद्ध विहाराचे उद्घाटन ४ सप्टेंबर रोजी होत आहे. या कार्यक्रमालाही भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. उदगीर शहरातील तळवेस येथे बुध्द विहाराचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बुद्ध विहार कर्नाटकातील कलबुर्गी येथील बुध्द विहाराची प्रतिकृती आहे.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात