Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न,देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न,देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवणी तालुक्यातील इंद्राळ येथे बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून देवणी पोलिसांत बापाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या तोंडावर बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे, याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील इंद्राळ येथे ४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रात्री झोपेत असलेल्या आपल्या पोटच्या मुलीवरच बापाने वाईटहेतुने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.यावेळी मुलीने ओरडण्याने मी जावुन पाहिले शिवाय मी पतीला विचारणा केली असता मलाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने करून  पतीच्या विरोधात देवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुरनं ५४/२५ कलम ७४,७५ भारतीय न्याय संहिता व सह कलम ८, १२ पोस्को अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी धोंडिबा मुरारी कांबळे याला न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि गौड हे करीत आहेत.
सदरील घटनेबाबत तालुक्यातुन संताप व्यक्त होत आहे.शिवाय आरोपीस अपंग पत्नी,सात मुली व एक मुलगा असताना ही घडलेली घटना अत्यंत निंदनीय असल्याचे बोलले जाते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात