Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जेमला नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

जेमला नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम

मुखेड: महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च - एप्रिल २०२५ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ०५ मे रोजी मंडळाने जाहीर केला. जेमला नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा सकनुर तांडा ता. मुखेड जि.नांदेड येथील अती दूर्गम,डोंगराळ भागातील शाळेने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आपल्या  उज्वल यशाची परंपरा कायम राखत शाळेतील एकूण १७६ विद्यार्थ्यांपैकी १६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विज्ञान व कला शाखेचा एकूण निकाल ९६.२ % लागला असून,विज्ञान शाखेचा ९६.८२% ,तर कला शाखेचा ९४ टक्के निकाल लागला लागल्याने   आश्रमशाळेने घवघवीत यश प्राप्त केले. 
*विज्ञान शाखेतून* कु. शिराळे आदिती संभाजी ९०.१७ % टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला तर
कु.राठोड साक्षी उत्तमराव ८९.३३ % टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला तर 
पाटील वैभव ज्ञानेश्वर ८८.८३% टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे आणि 
*कला शाखेमध्ये* कु.चिंचोले शिवकांता शेषराव हिने ८४.८३% टक्के घेऊन प्रथम क्रमांक मिळविला तर कु.शिंदे अश्विनी श्रीराम ८२.३३ टक्के घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला तर कदम कृष्णा तानाजी याने ७९.५० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.
परिक्षेत १७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी विशेष प्राविण्यसह १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ५८ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून ३ विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष श्री भिमरावजी राठोड,बाळासाहेब राठोड, प्राचार्य प्रा.जनार्दन पवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री.आर.के.राठोड, प्रा. नुरुंदे, प्रा.जाधव ,प्रा. शेळके, प्रा. संतोष राठोड, प्रा. श्रीनिवास राठोड, प्रा. पल्लेवाड, प्रा. प्रवीण रेड्डी, प्रा. अक्षय एकेलीकर  व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात