Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा परिसरात अवैध धंदे चालण्यास पोलीस बीट आमलदार जबाबदार ..! -----

वाढवणा परिसरात अवैध धंदे चालण्यास पोलीस बीट आमलदार जबाबदार ..! -----


वाढवणा/ प्रतिनिधि
पोलिस अधिकारी व जनता यातील दुवा म्हणून काम करणारे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या बीट मध्ये कर्तव्य बजावणारे पोलिस आमलदार हे सतर्क असले  पाहिजे.  आणि अवैध धंदे चालक व  गुन्हेगार यांची माहीती घेऊन त्यांच्यावर करडी नजर ठेवत गुन्हेगारांचा व अवैध धंद्यांचा पर्दाफास केला पाहीजे, मात्र तसे होताना दिसत नाही. तर पोलिसांचे अवैध धंदे चालकांशी मैत्रीचे संबंध असल्याचे संपुर्ण जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे . 
  वाढवणा, वाढवणापाटी, नळगीर, डोंगरशेळकी, हाळी हंडरगुळी या चार (बीट) दूरक्षेत्रात खुलेआम अवैध धंदे, मटका व दारु विक्री सुरू असुन यास संबंधित बिट अंमलदारच जबाबदार आहेत. 
        शाळा, मंदिर व मस्जिद अशा पवित्र ठिकाणाजवळ मटका राजरोसपणे खेळला जात आहे तर परवाना धारक देशी दारु दुकानातुन पेट्याच्या पेट्या पार्सल अवैधरित्या दारु विक्रीसाठी जात आहे. अशा प्रकारे अनेक धंदे या परिसरात जोरदार सुरू आहेत. मटका खेळताना व खेळविताना मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी दिसत आहेत. पोलीस मात्र आपले कर्तव्य विसरून अवैध धंदे वाल्यांशी मैत्री पूर्ण व्यवहार करीत असल्यामुळे पोलिसांची वचक अवैध धंदे चालकांवर राहिली नाही. पोलिस अधिक्षक लातुर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी अवैध धंद्यांवर धाडी घालण्याच्या सुचना दिल्यास पोलिस मटका बुकी चालकावर  कारवाई न करता . त्यांच्या आजुबाजुला फिरणाऱ्या व्यक्तिवर कारवाई करतात 
 व लागलीच त्यास ठाण्यातून संबंधिताकडून सोडविले जाते.  तेंव्हा असे न होता मटका बुकी चालकावरच कारवाई होणे आवश्यक आहे. या परिसरात दररोज दोन ते तीन लाख रुपयांचा मटका खेळला जात आहे.  यात मटका बुकी चालकास शेकडा दहा टक्के प्रमाणे दररोज पाच ते दहा हजार  कमाई होत असते. त्यामुळे मटका बुकी चालक श्रीमंत झालेले आहेत तर  खेळणारे मात्र कंगाल झालेले दिसत असुन अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाल्याचे निदर्शनास येत आहे.  तेंव्हा पोलीस अधीक्षक लातुर व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी वाढवणा पोलीस ठाणे अंतर्गत क्षेत्रातील अवैध धंदे चालकावर कारवाई करुन कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्यास अवैध धंदे बंद करण्यास वेळ लागणार नसल्याचे या परिसरातील जाणकार मंडळींकडून चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात